नागपुरात एक हजार नवे कोरोनाबाधित, जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढला - नागपूर कोरोनाबाधितांची संख्या
नागपुरात रुग्णसंख्या घटत असून मागील 3 आठवड्यात 58 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबत सक्रिय रुग्णसंख्या घसरून 17 हजाराच्या घरात आली आहे. यात रुग्ण रिकव्हरी दर हा वाढला असून 94.50 वर जाऊन पोहचला आहे. मागील 24 तासात एक हजार नव्या बाधितांची नोंद झाली आहे.
नागपूर - नागपुरात रुग्णसंख्या घटत असून मागील 3 आठवड्यात 58 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबत सक्रिय रुग्णसंख्या घसरून 17 हजाराच्या घरात आली आहे. यात रुग्ण रिकव्हरी दर हा वाढला असून 94.50 वर जाऊन पोहचला आहे. यात मागील 24 तासात एक हजार नव्या बाधितांची नोंद झाली असून आज 3,159 जण हे कोरोनामुक्त झाले आहे.
नागपूर जिल्ह्यात गुरुवारी 19 हजार 019 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण एक हजार रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 411 तर ग्रामीण भागातील 576 बाधित रुग्ण मिळून आले आहेत. तसेच 33 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यामध्ये शहरी भागात 8, ग्रामीण भागातन 12 तर जिल्हाबाहेरील 13 जण हे कोरोनामुळे दगावले आहेत. तसेच 3 हजार 159 जणांपैकी शहरात 1,362 तर ग्रामीण 1797 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 17 हजार 054 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 68 हजार 931 जण रुग्ण कोरोनाबाधित झाले आहे. यातून 4 लाख 43 हजार 159 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 8718 वर जाऊन पोहोचला आहे.
पूर्व विदर्भात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दरात घसरण -
पूर्व विदर्भात 2 हजार 364 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 5 हजार 765 जण नव्याने कोरोनाबाधित मिळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 68 जण हे कोरोनामुळे दगावले आहेत. यात बाधितांच्या तुलेनेत 3 हजार 401 अधिकचे रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.