महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Neet Result: नीट परिक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या; दुर्गम भागातील सोळा विद्यार्थ्यांनी मिळविले यश - student success story

नागपूरमध्ये नीट परिक्षेच्या निकालानंतर एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तर गडचिरोली आणि मेळघाट या दुर्गम भागातील सोळा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

Neet Result
नीट परिक्षेचा निकाल

By

Published : Jun 15, 2023, 1:16 PM IST

नागपूर : नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने नागपुरात एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. भावेश तेजू सिंग राठोड असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री त्याने हे पाऊल उचलले. राठोड हा मूळचा वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील रहिवासी आहे. डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो नागपूरला आला होता. परीक्षेचा निकाल जाहीर झाला, तेव्हा त्याला एकूण 720 पैकी 588 गुण मिळाले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कमी गुण मिळाल्याने निराश :उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण म्हणाले की, राठोडच्या खोलीत आत्महत्येची चिठ्ठी सापडली आहे. त्यात अत्यंत कमी गुण मिळाल्याने निराश झाल्याचा उल्लेख आहे. राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा ही संपूर्ण भारतातील एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी) आणि बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा आहे.

विद्यार्थी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण :महाराष्ट्रातील गडचिरोली आणि मेळघाट या दुर्गम गावांतील सोळा विद्यार्थी नीट परिक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले आहेत. लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट' (LFU) या संस्थेने पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या संस्थेने दोन वर्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले होते. त्यासाठी विदर्भातील 30 उमेदवार हे या योजनेचा भाग होते. उत्तीर्ण झालेले 16 विद्यार्थी याचाच भाग आहेत.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया : उत्तीर्ण झालेल्या एका आदिवासी युवकाने सांगितले की, ते गोंडी भाषा बोलतात आणि त्याला इंग्रजी शिकण्यात अडचण येत होती. पण लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटने बनवलेल्या डिक्शनरीत गोंडी शब्द इंग्रजीत भाषांतरित केल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला, असे ते म्हणाले. तसेच दुसरा विद्यार्थी म्हणाला की, मला एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा किशोरला आहे. वैद्यकीय शिक्षणानंतर मला माझ्या मूळ गावी परतायचे आहे आणि येथील लोकांची सेवा करायची आहे.

हेही वाचा :

  1. MBBS Student Suicide : नैराश्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहिले भावनिक पत्र
  2. Student Suicide : एका मित्राकडून उसने पैसे घेऊन दुसऱ्याला दिले, दुसऱ्याने दिला दगा, 'त्याची' आत्महत्या
  3. SSC Result 2023 : 59 वर्षाच्या आज्जी झाल्या दहावी उत्तीर्ण; तब्बल 40 वर्षानंतर घेतले पुस्तके हातात

ABOUT THE AUTHOR

...view details