महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जबलपूर-नागपूर महामार्गावर अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Ritesh Bhopare Police Accident Nagpur

मरारवाडी गावाजवळ सकाळच्या सुमारास नागपूर-जबलपूर मार्गावर बोलेरो वाहन आणि कारमध्ये भीषण अपघात झाला होता. यावेळी कारमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी रस्ता ओलांडताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली.

nagpur
जबलपूर-नागपूर महामार्गावर अपघात

By

Published : Jan 12, 2020, 5:35 PM IST

नागपूर- नागपूर-जबलपूर महामार्गवरील अज्ञात वाहनांच्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर, एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. रितेश भोपरे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते रामटेक पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

मरारवाडी गावाजवळ सकाळच्या सुमारास नागपूर-जबलपूर मार्गावर बोलेरो वाहन आणि कारमध्ये भीषण अपघात झाला होता. यावेळी कारमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी रस्ता ओलांडताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली. या घटनेत पोलीस कर्मचारी रितेश भोपरे यांच्या मृत्यू झाला तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा-धक्कादायक....बॅगचा बेल्ट स्कुलबसच्या दारात अडकल्याने विद्यार्थी आला चाकाखाली

ABOUT THE AUTHOR

...view details