नागपूर- जिल्ह्यात पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा मृतदेह आढळला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाघांच्या मृत्यूच्या घटना घडू लागल्याने वन विभागाची चिंता वाढली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन महिन्यांत राज्यात तब्बल १३ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
वाघांचे मृत्यूसत्र सुरूच; आणखी एक आढळला मृतदेह, तीन महिन्यात १३ वाघांचा मृत्यू - व्याघ्रप्रकल्प नागपूर
गेल्या दोन दिवसात तीन वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पहिली घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या केळझर येथे घडली होती. केळझर येथील पिर बाबा टेकडीजवळ पाण्यात 4 वर्ष वयाचा वाघीण मृत आढळून आली होती. दुसरी घटना ही यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील घोन्सा गावाजवळ घडली आहे. आता मंगळवारी आणखी एका वाघाचा मृत्यू झाला आहे.
संग्रहित छायाचित्र
वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. ७०७ मधील रिसाळा वनक्षेत्रातील वारापाणी बीटचे वनरक्षक श्रृंगारपुतळे यांना मंगळवारी सारा गावाजवळील छोट्या नाल्यात या वाघाचा मृतदेह आढळून आला. या वाघाचा मृतदेह हा छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. प्रथमदर्शनी ही शिकार असल्याचा अंदाज आहे. वाघाचा मृत्यू सुमारे आठ दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या
मृत वाघाचे चारही पंजे कापलेले आहेत.
Last Updated : Mar 24, 2021, 1:11 PM IST