महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्यास अटक - नागपूर क्राईम न्यूज

पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील २५ वा व्याघ्र प्रकल्प असून हे राखीव जंगलक्षेत्र हे वाघांचा विशेष अधिवास म्हणून घोषित करण्यात आले आहे. या राखीव जंगल क्षेत्रात मासेमारी करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरते.

तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्यास अटक
तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्यास अटक

By

Published : Jan 31, 2021, 10:24 AM IST

नागपूर- पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. विशेष व्याघ्र संरक्षणदलाल मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अक्रम शेख असे मासेमारी करणाऱ्याचे नाव असून त्याला वन कायदा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पुढील तपासासाठी वनकोठडी सुनावली आहे.

मासेमारी करणाऱ्या टोळक्याचा पाठलाग-


पूर्व पेंच वनपरिक्षेत्रच्या तोतलाडोह जलाशयामध्ये ७ ते ८ बोटीमध्ये काही व्यक्ती अवैधरित्या मासेमारी करत होते. घटनेची माहिती मिळताच पूर्व पेंच वनपरिक्षेत्रचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे हे अतिरिक्त मनुष्यबळासह घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर देवलापार पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पुंजरवाड आपल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. यात पथकातील जवानांनी अवैध मासेमारी करणाऱ्या टोळक्याचा पाठलाग करून एका मासेमाऱ्यास शिताफीने पकडले. रात्रभर चाललेल्या संयुक्त मोहिमेत मासेमाऱ्यांचा पाठलाग करून दोन बोटीसह जवळपास १५० नग जाळे जप्त करण्यात आले.

अधिक तपास सुरु

पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील २५ वा व्याघ्र प्रकल्प असून हे राखीव जंगलक्षेत्र हे वाघांचा विशेष अधिवास म्हणून घोषित करण्यात आले आहे. या राखीव जंगल क्षेत्रात मासेमारी करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरते. या घटनेचा तपास पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक अतुल देवकर, वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, वनपाल श्रीराम केकान, वनरक्षक गजानन गरके करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details