नागपूर- शहरातील वर्धमान नगरमधील पूनम मॉलचे छत आणि भिंतीचा काही कोसळला. यामध्ये ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू झाला. प्रकाश शर्मा असे मृताचे नाव आहे.
नागपुरात पूनम मॉलची भिंत अन् छत कोसळली, एकाचा मृत्यू - नागपुरात पूनम मॉल
नागपुरातील वर्धमाननगरमधील पूनम मॉलचे छत कोसळून प्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात पूनम मॉलची भिंत अन् छत कोसळली, एकाचा मृत्यू
नागपुरात पूनम मॉलची भिंत अन् छत कोसळली, एकाचा मृत्यू
गेल्या २ वर्षापासून पूनम मॉल बंद अवस्थेत पडला आहे. या मॉलच्यावर पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. त्या टाकीचा काही भाग मॉलवर कोसळला. त्यानंतर मॉलचे छत आणि भिंत कोसळल्याची माहिती अग्मिशमन विभागाने दिली. यावेळी या परिसरातील दुकाने बंद होती. मात्र, त्याठिकाणीच वॉचमॅनचे काम करणारे प्रकाश शर्मा या दुर्घटनेचे बळी ठरले.