नागपूर - आंध्रप्रदेशमधून पंजाबला कॉफीच्या पोत्यासह अंमली पदार्थ (गांजा) घेऊन जाणाऱ्या ट्रकला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. या ट्रकमधून 1100 किलो वजनाचा म्हणजेच 1 कोटी दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ट्रान्सपोर्टरच्या अंधारात ठेवून ट्रक ड्रायव्हर हे गांजा वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. यात 25 वर्षीय ट्रक ड्रायव्हर रोहित जयस्वाल आणि 31 वर्षीय सोनू चव्हाण किंनरचे नावर आहे.
एक कोटीचा गांजा केला जप्त, नागपूर गुन्हे शाखेची माठी कारवाई पोलिसांनी मिळाली होती माहिती
नागपूर जिल्ह्याच्या बुट्टीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक मालवाहू ट्रकमधून माहिती मिळाली. त्यामध्ये गांजा तस्करी होणार असून, जवळपास एक टन इतका गांज्याची वाहतूक होणार आहे. हा ट्रक आंध्राप्रदेशच्या विजयवाडा येथून कॉफीच्या मालासोबत लवपून गांज्याचा जकीरा पंजाबला नेणार होते. पण हिंगणघाट बुटीबोरी मार्गावर हा ट्रक जाणार असल्याने, पोलिसांनी मिळालेली महितिच्या आधारे ट्रकच ओळख पटवली. ट्रक क्रमांक आणि इतर माहितीच्या आधारे 40 ते 45 लाखाचा कॉफी बिया जात असतांना त्यात ट्रक थांबवत चौकशी केली असता, त्यामध्ये गांजा मिळून आला.
तब्बल एक कोटीचा गांजा केला जप्त, नागपूर गुन्हे शाखेची माठी कारवाई सापळा लावून अशी केली कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने गोपनिय माहीतीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. म्हत्वाच्या साहित्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. नाकाबंदी केली तेव्हा, हा ट्रक (आरजे 27 / जीए 8804)हिंगणघाटकडून बुटीबोरीकडे येतांना दिसून आला. दरम्यान, तपास केला असता ट्रकमध्ये कोको बिन्स म्हणजेच कॉफी बियाचे ३६५ बॅगचे सोबत ४० चुंगडयां(पोत्या)मध्ये अंमली पदार्थ आढळून आले. यावेळी 1 कोटी 10 लाख 44 हजाराचा मुद्देमाल आढळून आला.
तब्बल 1 कोटीचा गांजा केला जप्त, नागपूर गुन्हे शाखेची माठी कारवाई यांनी केली कारवाई
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिटटावार, सपोनि राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, पीएसआय जावेद शेख, पोलीस कर्मचारी गजेन्द्र चौधरी, महेश जाधव, नरेंद्र पटले, पोना रामा आडे, राजेश रेवतकर, आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, पोलीस महेश बिसने, अमृत किनगे, रोहन डाखोरे, चालक चासफौ साहेबराव बहाले, चापोका आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.