महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच सेना उमेदवाराच्या जावयाची हत्या - nagpur crime

जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक रात्र आधीच कन्हान परिसरात हत्या झाली आहे. कन्हानमधील शिवसेनेचे उमेदवार डायनल शेंडे यांचे जावई संजू खडसे (वय-35)  यांचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे.

one brutally stabbed in nagpur
जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक रात्र आधीच कन्हान परिसरात हत्या झाली आहे.

By

Published : Jan 7, 2020, 11:01 AM IST

Updated : Jan 7, 2020, 12:33 PM IST

नागपूर - जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक रात्र आधीच कन्हान परिसरात हत्या झाली आहे. कन्हानमधील प्रभाग क्रमांक ४ चे शिवसेनेचे उमेदवार डायनल शेंडे जावई संजू खडसे (वय-35) यांचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. सोमवारी (दि.6जाने)ला रात्री संजू खडसे हे कन्हान शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील गौरव बारमध्ये दारू प्यायला बसले होते. त्यांच्या बाजूला अन्य तिघेजण दारू पित होते. या तिघांनी दारूच्या नशेत ग्लासची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक रात्र आधीच कन्हान परिसरात हत्या झाली आहे.

संजू खडसेंनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, भांडणाला सुरुवात झाल्याने ते बारच्या बाहेर आले. यानंतर तिघांनीही संजय यांना मारहाण करून चाकूने वार केले. संजू खडसे रक्तबंबाळ अवस्थेत कोसळताच तिघांनीही पळ काढला.

हेही वाचा :साताऱ्याजवळ परप्रांतीय क‍ामगार‍ाचा खून

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून संजू यांना कन्हानच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना कामठी येथील खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Jan 7, 2020, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details