महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात बनावट ड्रायव्हिंग लायसन्स तयार करून देणाऱ्याला अटक - मौदा पोलीस कारवाई

मौदा पोलिसांनी आरोपी नवाब जमीर बेग याच्या दुकानातील एक संगणक, एक प्रिंटर, 08 बनावट ड्रायव्हिंग लायसन व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने आतापर्यंत किती लोकांना अशाप्रकारे बनावट लायसन्स तयार करून दिले आहे, याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

नागपूर बनावट
नागपूर बनावट

By

Published : May 19, 2021, 2:48 AM IST

नागपूर -नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलिसांनी बनावट ड्रायव्हिंग लायसन तयार करून देणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर ग्रामीण आणि मौदा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव नवाब जमीर बेग असे असून त्याच्या दुकानातून संगणक, फोटो प्रिंटर इत्यादी साहित्य जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून अनेक लायसन्स सुद्धा जप्त केली आहेत.

बनावट लायसन्स संदर्भात अनेक तक्रारी वाढत असल्याने नागपूर ग्रामीणचे प्रादेशीक परिवहन अधिकारी या संदर्भात आरोपींचा शोध घेत असताना नवाब जमीर बेग नामक आरोपीच्या ग्राफिक्स सेंटरमध्ये लायसन्स तयार करण्यात येत आल्याची माहिती त्यांच्या हाती लागली होती. त्याआधारे साहायक मोटर वाहन निरीक्षक अमीत कराड यांनी मौदा पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर मौदा पोलिसांनी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या नेतृत्वाखाली आरोपी नवाब जमीर बेग याच्या मालकीच्या नवाब ग्राफिक्स सेंटरवर धाड टाकली, त्यावेळी आरोपी परिसरातील लोकांना वाहन चालविण्याचा बनावट परवाना तयार करुन देत असल्याचे निष्पन्न झाले. या आधारे मौदा पोलिसांनी आरोपी नवाब जमीर बेग याला अटक केली आहे.


दुकानातील साहित्य जप्त

मौदा पोलिसांनी आरोपी नवाब जमीर बेग याच्या दुकानातील एक संगणक, एक प्रिंटर, 08 बनावट ड्रायव्हिंग लायसन व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने आतापर्यंत किती लोकांना अशाप्रकारे बनावट लायसन्स तयार करून दिले आहे, याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details