महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

World Food Day : जागतिक खाद्यान्नदिनी शेफ विष्णू मनोहर यांनी बनवला दोन हजार किलोचा चिवडा

जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा नागपूरने इतिहास रचला आहे. जागतिक खाद्यान्न दिनाचे ( World Food Day ) औचित्य साधून शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल दोन हजार किलो कुरकुरीत चिवडा एकाचं वेळी एकाच कढईत तयार केला (Chef Vishnu Manohar made 2000 kg Chivda Nagpur ) आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात चिवडा तयार करण्याचा हा पहिलाचं प्रयोग आहे.

World Food Day
खाद्यान्न दिन

By

Published : Oct 16, 2022, 4:54 PM IST

Updated : Oct 16, 2022, 7:40 PM IST

नागपूर :जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा नागपूरने इतिहास रचला आहे. जागतिक खाद्यान्न दिनाचे ( World Food Day ) औचित्य साधून शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल दोन हजार किलो कुरकुरीत चिवडा एकाचं वेळी एकाच कढईत तयार केला (Chef Vishnu Manohar made 2000 kg Chivda Nagpur ) आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात चिवडा तयार करण्याचा हा पहिलाचं प्रयोग आहे.

दोन हजार किलोचा चिवडा

दोन हजार किलोचा चिवडा :एकाचं वेळी दोन हजार किलोचा चिवडा हा विष्णू मनोहर यांचा १४ वा विश्व विक्रम आहे. यापूर्वी गणेशोत्सवा दरम्यान त्यांनी अडीच हजार किलोचा सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. नागपूर शहरातील रामदासपेठच्या विष्णूजीकी रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत चिवडा तयार आला. दिवाळी आणि जागतिक खाद्यान्न दिवसाचे निमित्त साधून चिवडा तयार करण्याचा निर्णय शेफ विष्णू मनोहर यांनी घेतला होता.

मध्यप्रदेशातील चिवडी :एकाचं वेळी तब्बल दोन हजार किलो चिवडा कुरकुरीत व्हावा यासाठी मध्यप्रदेशच्या उज्जैन येथून ६०० किलो चिवडी मागवण्यात आली होती. याशिवाय बदाम,काजूही त्यात त्यात टाकण्यात आले होते.

दोन हजार किलोचा चिवडा

चिवड्यासाठी वापरण्यात आलेले जिन्नस :दोन हजार किलोचा कुरमुरीत चिवडा तयार करण्यासाठी शेंगदाणा तेल ३५० किलो, शेेंगदाणे १०० किलो, काजू,किसमीस १०० किलो, डाळवा व खोबरे प्रत्येकी ५० किलो, हिंग व जीरे पावडर प्रत्येकी १५ किलो, मिर्ची पावडर ४० किलो, कढीपत्ता व सांभार प्रत्येकी १०० किलो, वाळलेले कांदे ५० किलो, धने पावडर ४० किलो लागणार आहे.

विश्वविक्रमी विष्णू मनोहर : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. काहीं दिवसांपूर्वी त्यांनी गणेशोत्सवात अडीच हजार किलोचा सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. यापूर्वी त्यांनी ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असा "सर्वात लांब पराठा' तयार केला होता. ७ हजार किलोची महा मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी ३ हजार२०० किलो वांग्याचे भरीत होते. चिवड्याचा मनोहर यांचा १४ वा विश्व विक्रम आहे. सलग ५३ तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत.

Last Updated : Oct 16, 2022, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details