नागपूर -लवकरच देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर प्लास्टिकच्या कपाऐवजी मातीच्या कपात म्हणजेच कुल्हडमध्ये चहा मिळणार आहे. याबाबतचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक प्रस्ताव रेल्वेमंत्री पियूश गोयल यांना दिला आहे. हा प्रस्ताव गोयल यांनी मान्य केला आहे. ते लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
देशातील 400 रेल्वे स्थानकांवर मिळणार 'कुल्हड' चहा - नितीन गडकरी - मातीचा कप
लवकरच देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर प्लास्टिकच्या कप ऐवजी मातीच्या कपात म्हणजेच कुल्हडमध्ये चहा मिळणार आहे. याबाबतचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक प्रस्ताव रेल्वेमंत्री पियूश गोयल यांना दिला आहे.
400 रेल्वे स्थानकांवर कुल्हडमध्ये मिळणार चहा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती
या उपक्रमामुळे कुंभार समाजाच्या लोकांना मेठ्या प्रमाणावर कुल्हड बनवण्याचे काम मिळेल. ज्यामुळे कुंभार समाज आपली प्रगती साधू शकेल. देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक कपऐवजी मातीच्या कपात चहा दिल्याने कुंभाराच्या हाताला काम मिळेल. तसेच, त्यांची कलादेखील जोपासली जाईल, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे.