नागपूर - महात्मा गांधी यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या विरोधात सीताबर्डी पोलीस ठण्यात तक्रार करण्यात आली आहे. अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याच्या विरोधात 'नोईंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स ग्रुप'ने मयूर जोशी नावाच्या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
गांधीजींच्या विरोधात फेकबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात तक्रार
अत्यंत आक्षेपार्ह भाषेत गांधीजींच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी 'नोईंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स ग्रुप'ने मयूर जोशी नावाच्या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
नागपूर
सीताबर्डी पोलिसांनी हे प्रकरण सायबर शाखेकडे वर्ग केले असून या बद्दल अधिक तपास पोलीस करीत आहेत. सध्या अनेक समाजकंटक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात विनाकारण महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्ये करत असतात. अल्प अथवा चुकीच्या माहितीच्या आधारे महापुरुषांना लक्ष्य केले जाते, असाचा प्रकार नागपुरात घडल्याचे निदर्शनास आले आहे.