नागपूर OBC vs Maratha Reservation : राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन मोठा वाद सुरू आहे. यातच मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात नवीन वाद पेटला. (Marathas Will Not Remain ) आता मंत्री छगन भुजबळ यांनी नवा दावा केला आहे. (Chhagan Bhujbal On Maratha Reservation) सगळेच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत, त्यामुळे मराठा शिल्लक राहणार नाहीत, असा दावा छगन भुजबळ यांनी आज नागपुरात केला. त्यामुळे आता पुन्हा छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Kunbi certificate for Marathas)
काय म्हणाले छगन भुजबळ :"मला वाटतं काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, मराठा शिल्लक राहणार नाही. सर्वच मराठा कुणबीचे प्रमाणपत्र घेत आहेत, हेच चाललेलं आहे. आयोगाचे लोक राजीनामे देत आहेत. ओबीसी आयोग राहिला नाही तर मराठा आयोग राहिला आहे" असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. "सर्व मराठा ओबीसीमध्ये येऊ घातले आहेत. त्यामुळे आता काहीही करण्याची गरज नाही. जरांगे पाटलांच्या मनाप्रमाणं सर्व गोष्टी घडवल्या जात आहेत. ओबीसीमध्ये फूट पाडली जात आहे" असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला आहे.
ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न :"हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्याची गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत" असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला आहे. मराठा आंदोलनामुळे आता ओबीसी नेत्यातील वाद पुन्हा अधोरेखित झाला आहे. ओबीसी नेत्यांमध्ये फूट पाडत असल्याचा वारंवार आरोप होत आहे.