महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आत

नागपुरात नवीन बाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात येत असून सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 336 वर आली आहे. यात रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 353 असून यात गृहविलगीकरणात असणारे बाधित रुग्ण हे हजाराच्या आत आले आहेत.

nagpur corona
nagpur corona

By

Published : Jun 16, 2021, 10:28 PM IST

नागपूर -नागपुरात नवीन बाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात येत असून सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 336 वर आली आहे. यात रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 353 असून यात गृहविलगीकरणात असणारे बाधित रुग्ण हे हजाराच्या आत आले आहेत. यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. यातच ग्रामीण भागातील 13 गाव कोरोनामुक्त झाले असून काही तालुके सुद्धा आता कोरोनामुक्त होत आहे.

नागपूर जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालात 10 हजार 406 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 86 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरी भागात 49 तर ग्रामीण भागात 35 बाधित रुग्ण मिळून आले आहेत. तसेच 3 जण दगावले आहेत. यामध्ये शहरी भागात 1, तर मागील चार दिवसांपासून ग्रामीण भागात एकही रुग्ण मिळून आलेला नाही, तर जिल्ह्याबाहेरील 2 जण दगावले आहेत. तेच 279 जणांपैकी शहरात 231 तर ग्रामीण 48 जण कोरोना मुक्त झाले आहे. यात 353 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 983 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.


आतापर्यंतची परिस्थिती -

आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घटून 1 हजार 336 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 577 जण रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. यातून 4 लाख 66 हजार 228 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात मृत्यूचा आकडा हा 9013 वर जाऊन पोहचला आहे. नागपुरात सध्या रिकव्हरी रेट हा 97.83 टक्क्यांवर असून रोज यात वाढ होत आहे.

सहा जिल्ह्यात 7 मृत्यू -

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 561 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 223 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 10 जण हे कोरोनाचे बळी ठरले आहे. यात बाधितांच्या तुलेनेत 338 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.80 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 1.06 वर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details