महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाने पुन्हा 47 जणांचा घेतला बळी, 3 हाजर 597 पॉझिटिव्ह रुग्णांची भर - नागपूर कोरोना घडामोडी

रुग्णसंख्या वाढ सुरूच आहे. पण, या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात 47 जणांचा बळी कोरोनाने गेला आहे. तेच नागपूर जिल्ह्यात 3597 नवीन बाधितांची भर पडली आहे.

नागपूर
नागपूर

By

Published : Mar 26, 2021, 4:28 PM IST

नागपूर- कोरोनाची परिस्थिती नागपुरात दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्णसंख्या वाढ सुरूच आहे. पण, या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात 47 जणांचा बळी कोरोनाने गेला आहे. तेच नागपूर जिल्ह्यात 3597 नवीन बाधितांची भर पडली आहे.

नागपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 16 हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 978 रुग्ण हे ग्रामीण भागातून तर शहरात 2597 रुग्ण बाधित झाले असून 4 बाहेर जिल्ह्यातील आहे. यात सर्वाधिक 33 रुग्ण हे शहरातील दगावले आहे. तेच ग्रामीणमध्ये ग्रामीण मधील 10 जिल्ह्याबाहेरील 4 अशा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 4784 बधितांचा मृत्यू झाला होता. तेच सक्रीय रुग्णसंख्या ही 35 हजारच्या घरात जाऊन पोहचली आहे.

पूर्व विदर्भात 4 हजार 512 तेच 49 जण कोरोनाने सहा जिल्ह्यात दगावले आहे. यात भंडारा 244, चंद्रपूर 245, गोंदिया 88, तर वर्धा 319, गडचिरोली जिल्ह्यात 37 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तेच 2 हजार 864 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details