नागपूर- शहर पोलिसांना अट्टल सोनसाखळी चोरट्यास जेरबंद करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ५४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या कडून ७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.
५४ गुन्ह्यांची नोंद असलेला अट्टल सोनसाखळी चोर पकडण्यात पोलिसांना यश - dcp rajtilak roushan
स्वरूप लोखंडे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. स्वरूप हा वयाच्या १७ वर्षापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. बऱ्याच दिवसांपासून स्वरूप पोलिसांच्या 'हिट लिस्ट'वर होता. तो अत्यंत हुशार असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, त्याची संपूर्ण हुशारी शहर पोलिसांनी उघडी पाडली आहे.
स्वरूप लोखंडे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. स्वरूप हा वयाच्या १७ वर्षापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. बऱ्याच दिवसांपासून स्वरूप पोलिसांच्या हिट लिस्टवर होता. तो अत्यंत हुशार असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, त्याची संपूर्ण हुशारी शहर पोलिसांनी उघडी पाडली आहे. अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्वरूप सदृष्य आरोपी दिसत होता, मात्र पोलिसांना तो सापडत नव्हता. स्वरूप चोरी करताना हेल्मेट घालून वेगवेगळ्या मोटर सायकलचा वापर करायचा. त्यामुळे त्याला पकडने कठीण झाले होते.
काही केल्या तो सापडत नसल्याने पोलिसांनी देखील शिताफीने आपली शोध चक्रे फिरवायला सुरुवात केली. पोलिसांनी सुरुवातीला त्याची माहिती गोळा करायला सुरुवात केली नंतर सापळा रचून त्याला पकडण्यात यश मिळविले. त्याच बरोबर आरोपी ज्या व्यक्तीकडे सोनसाखळी विकायचा, त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी स्वरूपकडून ७६ ग्रॅम सोन्याची चैन, मोटार सायकल आणि सोने विकून घेतलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत.