नागपूर- शहरातील तकीया धंतोली परिसरात कुख्यात गुंड नित्या उर्फ नितीन कुलमेथे याची सोमवारी निर्घृण हत्या झाली. मृत नित्या पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून त्याच्याच दोन मित्रांनी त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
कुख्यात गुंड नितीन कुलमेथे उर्फ नित्याची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक - chinmay pandit
संध्याकाळी नित्या त्याच्या घराबाहेर बसला असताना आरोपी पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. नित्या खबरी झाल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संध्याकाळी नित्या त्याच्या घराबाहेर बसला असताना आरोपी पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात नित्या गंभीर जखमी झाला होता. अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरत त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या घराच्या काही अंतरावरच आरोपींनी त्याला पुन्हा गाठून त्याची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडितदेखील घटनास्थळी आले. त्यानंतर मृतक हा कुख्यात गुंड नितीन उर्फ नित्या असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी मारेकऱ्यांना शोधण्यास सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या मारेकऱ्यांना अटक केली आहे.
नित्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर १९९५ ते २००९ या काळात अनेक गंभीर गुन्हे धंतोली पोलीस ठाण्यासह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. २००९ नंतर तो कुटुंबासह पंढरपूर येथे स्थायिक झाला होता. मात्र, त्याचे एक घर तकीया धंतोली परिसरात असल्याने तो अधून-मधून तेथे राहायला यायचा. गेल्या दोन महिन्यांपासून तो इथेच राहत असल्याची माहितीदेखील तपासातून समोर आली आहे. नित्या हा पोलिसांचा खबरी असल्याच्या संशय आरोपींना होता. आरोपींसंदर्भांतील माहिती तो पोलिसांना पुरवत असल्याच्या संशयावरून आरोपींनी त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.