महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis In Court: देवेंद्र फडणवीस न्यायालयात हजर, काय आहे प्रकरण? - २०१४ विधानसभा निवडणूक शपथपत्र

२०१४ विधानसभा निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ऍड. सतीश उके यांनी केला आहे. त्यांनी या विषयावर स्थानिक प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर होऊन बयान नोंदवला आहे.

Devendra Fadnavis In Court
देवेंद्र फडणवीस

By

Published : Apr 15, 2023, 2:16 PM IST

Updated : Apr 15, 2023, 4:29 PM IST

वकील उदय डबले कोर्ट प्रकरणाविषयी बोलताना

नागपूर:2014 च्या निवडणूक शपथपत्रात फडणवीस यांनी दोन गुन्हे लपविल्याचा आरोप ऍड. सतीश उके यांनी केला होता. सतीश उके यांच्यावर सध्या ईडी प्रकरणातील आरोप आहेत. सुनवणी दरम्यान उके यांच्या बाजूने युक्तिवाद आणि साक्षीपुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानंतर कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत आरोपीला स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहावे लागते. फडणवीसांनी आज (शनिवारी) नागपुरातील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावली.

देवेंद्र फडणवीसांनी आरोप नाकारले:२०१४ विधानसभा निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याच्या आरोपावर उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज न्यायालयात हजर झाले होते. आतापर्यंत या प्रकरणात सादर करण्यात आलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाने फडणवीसांना आपले काय मत आहे, असे विचारले. फडणवीसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर राजकीय वैमनस्याने प्रेरित आरोप करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनवाई ६ मे रोजी होणार आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचे साक्षी पुरावे सादर करू शकतील, अशी माहिती फडणवीस यांचे वकील उदय डबले यांनी दिली आहे.


काय आहे नेमकं प्रकरण?: भाजप देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात 1996 आणि 1998 मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागपत्रांसर्भात गुन्हा दाखल केला होता. दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. आरोपांनुसार देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लिहिली नव्हती.

न्यायालयाने फेटाळली होती याचिका: ऍड. सतीश उके यांनी दाखल केलेली याचिका प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालय आणि उच्च न्यायालयाने फेटाळली होती. यानंतर निराश न होता Adv. उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१९ मध्ये आदेश देत प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी, असे स्पष्ट केले होते.


हेही वाचा:Bihar Hooch Tragedy: बिहारमध्ये विषारी दारूचा कहर.. २२ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

Last Updated : Apr 15, 2023, 4:29 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details