महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अध्यक्षांच्या निर्णयावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही - प्रफुल्ल पटेल - प्रफुल्ल पटेल

Praful Patel : विधानसभाध्यक्षांच्या निर्णयावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिलीय. अध्यक्षांच्या निर्णयावर कुणी बोलू शकत नाही. तसंच विरोधक विनाकारण बेछूट आरोप करत असल्याचं ते म्हणाले.

Praful Patel
प्रफुल्ल पटेल यांचे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर मत

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 7:39 PM IST

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर मत देताना प्रफुल्ल पटेल

नागपूरPraful Patel: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याच्या निर्णय दिलाय. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. त्यांना न्यायिक अधिकार आहे. शिवसेना प्रकरणात अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलंय. सभापतींनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर भाष्य करण्याचा अधिकार हा कोणालाही नसल्याचं ते म्हणाले. ते आज नागपूरच्या मिहान येथील कार्यक्रमात बोलत होते.न्यायालयाची एक प्रक्रिया आहे. त्या निर्णयावर टीका करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर बिकट परिस्थिती विरोधकांची झाली आहे. पोटदुखी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे बेछूट आरोप करत आहेत, ते योग्य नसल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले. (NCP)


आमची आणि शिंदे यांची केस वेगळी :अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करावं. हा निर्णय पक्षात असलेल्या पदाधिकारी आणि निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी बहुमतांनी निर्णय घेतला होता. आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये गेलेलो आहे. आमची याचिका इलेक्शन कमिशनकडे दाखल आहे. आमची आणि शिंदे यांची केस वेगळी आहे, असे विचारही प्रफुल्ल पटेल यांनी मांडले.

हेही वाचा:

  1. मुंबईतील अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
  2. सक्रिय राजकारणात सहभागी व्हा, घराणेशाही संपवा-पंतप्रधान मोदींचं युवकांना आवाहन
  3. श्रीराम नवमी सणाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा का नाही? प्रणिती शिंदेंची भाजपावर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details