नागपूर -राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी दरम्यान कोणत्या विषयांवर खलबत झाले असतील या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोणी कोणाला भेटावे यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, कोणी कितीही स्ट्रॅटजी तयार केली तरी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकी नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, यात शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -अघोरी खंडणी प्रकरण: काकासोबतच्या वादाचा वचपा काढण्यासाठी पुतण्या राजचा खून
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबईमध्ये पाणी तुंबल्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. यावर, या सरकारच्या नेत्यांना सकाळी उठून जे वाक्य सर्वात आधी तोंडात येते, ते म्हणजे अमुक बाबीसाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
नक्षली पत्राची चौकशी झाली पाहिजे
नक्षल विचार हा मुळातच विविध समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे. त्यामुळे, नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या पत्रकाची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.