नागपूर -आजचा दिवस नागपूरकरांसाठी काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. आज दिवसभरात एकही कोरोनाचा रुग्ण नागपुरात आढळून आला नाही. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६ वर स्थिरावली आहे. तर, ११ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या नागपुरात ४४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या २४ तासात नागपुरात एकही कोरोनाग्रस्त रूग्ण नाही - नागपूर लेटेस्ट कोरोना अपडेट न्यूज
गेल्या काही दिवसात मरकझ येथील परत आलेल्या तबलिघींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले होते. ज्यामुळे दर दिवसाला पाच ते दहा रुग्ण पुढे येत होते. १० एप्रिल रोजी तब्बल २५ कोरोनाबाधित रुग्ण पुढे आले होते. य़ा गोष्टीमुळे नागपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. नागपुरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात नागपूरात एकही कोरोनाग्रस्त रूग्ण नाही
गेल्या काही दिवसात मरकझ येथील परत आलेल्या तबलिघींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले होते. ज्यामुळे दर दिवसाला पाच ते दहा रुग्ण पुढे येत होते. १० एप्रिल रोजी तब्बल २५ कोरोनाबाधित रुग्ण पुढे आले होते. य़ा गोष्टीमुळे नागपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. नागपुरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मात्र, आज गेल्या २४ तासात एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडला नसल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५६ वर स्थिरावली आहे.