महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींच्या धमकीचे धागेदोरे थेट लष्कर-ए-तोयबापर्यंत! मास्टमाईंडला अटक करण्याकरिता पोलीस बेळगावला रवाना - नितीन गडकरी धमकी प्रकरण अपडेट

नितीन गडकरींना धमकी देण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे आता लष्कर-ए-तोयबापर्यंत पोहोचले आहेत. गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारा याच्या चौकशीत संवेदनशील माहिती मिळाल्यानंतर नागपूर पोलीस बेळगावला रवाना झाले आहेत. नागपूर पोलीस बेळगाव तुरुंगातून लष्कर-ए-तोयबाचा हस्तक अफशर पाशाला ताब्यात घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Nitin Gadkari Threat Case
नितीन गडकरी धमकी प्रकरण

By

Published : Jul 14, 2023, 12:37 PM IST

Updated : Jul 14, 2023, 1:10 PM IST

नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना झाल्याची माहिती

नागपूर-केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी प्रकरणात आणखी एक नवा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयेश पुजारा हा दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा आणि पीएफआयसाठी काम करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच गडकरींना धमकी देण्याच्या प्रकरणात लष्कर ए तोयबाचा हस्तक अफसर पाशा हा मास्टर माईंड असल्याचे समोर आले आहे.

नितीन गडकरींना धमकी दिल्या प्रकरणात जयेश पुजारी नागपूर कारागृहात आहे. चौकशीदरम्यान त्याने अनेक नेत्यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. संवेदनशील प्रकरण असल्याने या प्रकरणाचा तपास एनआयकडूनकडून सुद्धा करण्यात येत आहे. अफसर पाशा हा बेळगाव तुरुंगात बंदी असून त्याच्यावर २००३ मध्ये बांगलादेशच्या ढाका आणि २००८ मध्ये बंगळुरू येथे बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप आहे. अफसर पाशावर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

वर्षाच्या सुरुवातीला दोन वेळा दिली धमकी -या वर्षाच्या सुरुवातीला दोन महिन्यांत नितीन गडकरी यांच्या नागपुर येथील जनसंपर्क कार्यालयात कर्नाटक राज्यातील बेळगाव कारागृहातुन जयेश पुजारी याने दोनदा धमकीचे फोन करून खंडणी मागितली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन गुन्हे नागपुरात दाखल केले आहेत. तर या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यावर एनआयएने बंगळुरू येथे एक गुन्हा दाखल केला आहे. जयेश पुजारा उर्फ एलियास शकिलचे 'डी गॅंग' टोळीतील सदस्यांसोबत संबंध असल्याची यापूर्वीच माहिती समोर आली आहे. कर्नाटक येथील कारागृहात आल्यानंतर त्यांची भेट काही गुंड टोळ्यांसोबत झाल्यानंतर तो कारागृहातन आपले रॅकेट चालवत होता, असा देखील खुलासा झाला आहे.

पीएफआयच्या संपर्कात होता जयेश- जयेश पुजारा उर्फ शाकीरचे संबंध दहशतवादी संघटनांसोबत असल्याने नागपूर पोलिसांनी त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पुजारा पीएफआय नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा सचिव मोहम्मद अफसर पाशाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर आणखी एका कट्टरवादी पदाधिकऱ्यांच्या तो संपर्कात होता अशी माहिती तपासात पुढे आली आहे. दहशतवाद्यांनी जयेशचा ब्रेन वॉश केल्याचे पुढे आले आहे. नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीच्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याबाबतचे महत्त्वाचे धागेदोर मिळाले आहेत.

हेही वाचा-

  1. Nitin Gadkari Threat Case : 'डी गॅंग' सोबत संबंध उघड झाल्यानंतर जयेश पुजाराच्या पोलीस कोठडीत दहा दिवसांची वाढ
Last Updated : Jul 14, 2023, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details