नागपूर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सोलापूर येथील एक कार्यक्रमात भोवळ आल्यानंतर ते सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून नागपूरला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी तब्येत चांगली असल्याचे सांगितले.
नितीन गडकरींचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द; तब्येत बरी असल्याची प्रतिक्रिया - Nagpur
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या १५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना भोवळ आली. त्यामुळे त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर ते संध्याकाळी नागपूरला परत आले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज सोलापूर दौऱ्यावर गेले होते. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या १५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना भोवळ आली. त्यामुळे त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर ते संध्याकाळी नागपूरला परत आले आहेत.
विमानतळावर पोहोचल्यानंतर माझी तब्येत बरी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी निघून गेले. दरम्यान, गेल्या वर्षभरात नितीन गडकरी यांना २ वेळा मंचावर असताना भोवळ आल्याची घटना घडली आहे.