नागपूर - प्रणव मुखर्जी हे सर्वसमावेशक राजकारणी असल्याची मान्यता होती. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून अर्थ, वाणिज्य, संसदीय कार्य मंत्र्यांच्या रूपाने प्रभावी काम केले आहे. प्रणव मुखर्जी म्हणजे आमच्यासाठी गाईड आणि फिलॉसॉफर होते. केंद्रीय राजकारणात आल्यानंतर माझे आणि प्रणवदा यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. त्यांच्या निधनाने देश स्तब्द्ध झालेला आहे. त्यांचे भारतीय लोकतंत्रातील योगदान कधीही विसरता येणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. तसेच त्यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
आम्ही गाईड अन् फिलॉसॉफर गमावला - नितीन गडकरी - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
देशासाठी हा फार मोठा धक्का आहे. भारतीय राजकारणातील प्रणव मुखर्जी एक असे व्यक्तिमत्त्व होते त्यांना ज्या ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या, त्या त्यांनी कर्तव्यनिष्ठेने पूर्ण केल्याचे देखील नितीन गडकरी म्हणाले.
देशासाठी हा फार मोठा धक्का आहे. भारतीय राजकारणातील प्रणव मुखर्जी एक असे व्यक्तिमत्त्व होते त्यांना ज्या-ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या, त्या त्यांनी कर्तव्यनिष्ठेने पूर्ण केल्याचे देखील नितीन गडकरी म्हणाले.
सोमवारी सायंकाळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. त्यांना १० ऑगस्टला दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. त्यांना फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. ते कोमामध्ये गेले होते. सोमवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.