महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 3, 2020, 9:53 AM IST

ETV Bharat / state

'सरकारच्या नाही, 'एनएचएआय'च्या विश्वासावर गुंतवणूक उभी केली'

देशात तंत्रज्ञान आणि संसाधन हे महत्वाचे आहे. मात्र, त्यासोबतच प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि संयम देखील हवा. एकदा का त्यात विश्वासार्हता आली तर, पैशाची कमी जाणवणार नाही. आपणही रस्ते प्राधिकरणाचे काम करत असून त्याचे बजेट फार थोडेसे आहे. मात्र, तरीही पैशांची कमतरता नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी

नागपूर - माझ्या मंत्रालयाने देशात दर्जेदार रस्त्याचे जाळे विणायला सुरुवात केली आहे. माझ्या मंत्रालयाकडे बजेट फार कमी असला तरी पैशांची कमतरता मुळीच नसल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. ज्यावेळी परदेशी गुंतवणूकदार माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांना म्हणतो, की सरकारच्या विश्वासावर गुंतवणूक करायची असेल तर चहा घ्या, मला कोणतीच चर्चा करायची नाही. पण, जर तुम्हाला 'एनएचएआय'च्या विश्वासावर गुंतवणूक करायची असेल तर तुमचे स्वागत आहे.

केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी

नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, तंत्रज्ञान आणि संसाधन फार महत्त्वाचे आहेत. मात्र, त्याचबरोबर प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि संयम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्या देशात सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. पण उद्यमशीलता शिकवणारे एकही विद्यापीठ नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा - ....तेव्हाच माझं स्वप्न पूर्ण होईल, गडकरींनी बोलून दाखवली इच्छा

ज्यांना आपण मोठे समजतो ते मोठे असेलच असे नाही. कधी-कधी छोटा असणारासुद्धा मोठं काम करू शकतो. लोकांना असं वाटतं की, मला इंजिनिअरिंग क्षेत्रातील खूप काही समजते. पण तसे नाही मी फक्त निर्णय घेतो. मी राज्यात मंत्री असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तयार केला. अनेक पूल बांधण्यात यशस्वी झालो. पण, जेव्हा मी घर बनवायला गेलो तेव्हा ते काम मात्र बिघडलं. त्यामुळे उद्योग कुठलाही असो त्याचे ज्ञान आवश्यक आहे. ते घ्या आणि उद्योगाला दर्जा द्या, तुमचा उद्योग चालेलच, असे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हेही वाचा - महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details