नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरातील भेट घेतली. शहरातील महाल येथील संघ मुख्यालयात दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
लोकसभा पडघमः नितीन गडकरी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट - nagpur
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
भेटी दरम्यान, कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, आज भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या हल्ल्याची माहिती, नितीन गडकरी यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना दिल्याची सुत्रांची माहिती आहे.
पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ४० हून अधिक भारतीय जवान शहिद झाले, त्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करावी, अशी मागणी संघाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळेच आज पाकव्याप्त काश्मीर परिसरात वायुदलाने हल्ला केला. याची माहिती सरसंघचालकांना देण्यासाठी गडकरी पोहचले असल्याचे समजते.