नागपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की, सर्वांनी घरीच थांबा. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करा. कृपया स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे या संक्रमणापासून रक्षण करा, हेच तुमचे योगदान असेल, असे गडकरी यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगितले आहे.
घराबाहेर पडू नका, नितीन गडकरींचे जनतेला आवाहन - नागपूर जिल्हा बातमी
कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता, आता राज्यात संचारबंदी लागू करून राज्यातील जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.
नितीन गडकरी
कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता, आता राज्यात संचारबंदी लागू करून राज्यातील जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले आहे.