नागपूर - संरक्षण क्षेत्रात खूप त्रास आहे, मी संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांची दिलगिरी व्यक्त करून बोलतो, की तुमचे अधिकारी एक-एक फाइल आठ-आठ वर्ष फिरवतात, असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते नागपुरात येथे आयोजित विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होते.
संरक्षण क्षेत्रातील खरेदी प्रक्रियेत बदल करण्याची गरज - नितीन गडकरी - नितीन गडकरी बातमी
संरक्षण क्षेत्रातले अधिकारी फाईल वर लवकर निर्णय घेत नाहीत. अनेक वर्षे फाईल फिरते आणि जेव्हा खरेदीचा निर्णय करून निविदा काढली जाते, तोवर ती वस्तूच कालबाह्य झालेली असते.
हेही वाचा-रिलायन्स कंपनीच्या संचालकपदावरून अनिल अंबानी स्वत: पायउतार
संरक्षण क्षेत्रातले अधिकारी फाईलवर लवकर निर्णय घेत नाहीत. अनेक वर्षे फाईल फिरते आणि जेव्हा खरेदीचा निर्णय करून निविदा काढली जाते, तोवर ती वस्तूच कालबाह्य झालेली असते. संरक्षण क्षेत्रातील खरेदी प्रक्रियेत बदल करण्याची गरज आहे. तसेच संरक्षण क्षेत्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्राधान्य मिळत नाही. यामध्ये ही धोरणात्मक बदल आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले. विशेष म्हणजे कालच सर्वोच्च न्यायालयाने राफेल लढाऊ विमान खरेदी प्रक्रियेला अचूक सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळ्या आहेत.