नागपूर- भाजपचे नेते व खासदार नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज (सोमवार) त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो नागपूरकरांनी गर्दी केली होती. यामध्ये स्थानिक आणि राज्यातील अनेक नेत्यांचा समावेश आहे.
नितीन गडकरी यांचे 64 व्या वर्षात पदार्पण; शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ - नितीन गडकरी
नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे.
.
भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे. गडकरी निवडून आल्याचा उत्साह आणि नेत्याचा वाढदिवस यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. सकाळपासुनच कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असून प्रत्येकजण गडकरी यांना शुभेच्छा देत आहे, तर गडकरी यांनीसुद्धा बाहेर बसून कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत आहे. गडकरी यांनी कुटुंबासह केक कापत वाढदिवस साजरा केला. तसेच बाहेरून येणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचीसुद्धा दिवसभर रेलचेल असणार आहे.