नागपूर - '२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूर लोकसभा क्षेत्रातील मतदार मला ५ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून देतील, असा मला विश्वास आहे,' असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथील कार्यक्रमात केले.
५ लाखापेक्षा जास्त मताने जिंकून येईल असा मला विश्वास - नितीन गडकरी - win ls polls
नागपूर क्षेत्रातून २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ३ लाख मतांनी विजय झाला होता. या खेपेस आपण ५ लाखांपेक्षा अधिक मतांनी जिंकून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा क्षेत्रातील पहिल्या टप्यातील निवडणुकांमध्ये नागपूर लोकसभा क्षेत्राचा समावेश आहे. नागपूर क्षेत्रातून२०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ३ लाख मतांनी विजय झाला होता. या खेपेस आपण ५ लाखांपेक्षा अधिक मतांनी जिंकून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
'हे सर्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शक्य झाले आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असताना मी विशेषतः विदर्भातील रस्ते, पूल यांची बांधकामे केली. आता केंद्रात मंत्री झाल्यानंतर आता विदर्भ, महाराष्ट्र राज्य व देशभरात काम करण्याची संधी प्राप्त झाली. ज्याप्रमाणे भारताचा विकास होत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र, विदर्भ व नागपूर शहराचा विकास होत आहे,' असेही ते यावेळी म्हणाले.