महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 20, 2020, 4:30 PM IST

Updated : Feb 20, 2020, 5:42 PM IST

ETV Bharat / state

नागपूर न्याायालयात वकिलांचा जोरदार युक्तिवाद, फडणवीसांबाबत पुढील सुनावणी 30 मार्चला

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात काळात गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने तुर्तास त्यांना दिलासा दिला असून, जामीन मंजूर केला आहे. त्यांच्याबाबत पुढील सुनावणी ३० मार्चला होणार आहे.

Next hearing on Devendra Fadnavis is on March 30 in nagpur
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर - निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात २ गुन्ह्यांची माहिती लपवल्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (गुरुवार) नागपूरच्या कनिष्ठ हजर झाले होते. यावेळी याचिकाकर्ते वकील सतीश उके आणि फडणवीस यांचे वकील सुनील मनोहर यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने फडणवीसांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, पुढील सुनावणी ३० मार्चला होणार आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे विविध कारणाने ४ वेळा न्यायालयात उपस्थित राहू शकले नव्हते. आज ते न्यायालयात हजर झाले. तुर्तास न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. न्यायालयात दोन्ही पक्षाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला, त्यानंतर न्यायालयाने फडणवीस यांना जामीन मंजूर केला.

नागपूर न्याायालयात वकिलांचा जोरदार युक्तिवाद

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा; फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी न्यायालयाकडून जामीन मंजूर

हेही वाचा - 'भारताला मोठं करण्यासाठी हिंदुत्वाला मजबूत करण्याची गरज'

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी २ गुन्ह्यांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत नागपुरातील वकील सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती. यापूर्वी 4 वेळा फडणवीस सुनावणीसाठी हजर राहिले नव्हते. तेव्हा न्यायालयाने त्यांना शेवटची संधी देत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस न्यायालयात हजर झाले. तेव्हा त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. याचिकाकर्ते वकील सतीश उके यांनी त्याला जोरदार विरोध केला मात्र, फडणवीस यांचे वकील सुनील मनोहर यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना 15 हजारांच्या पीआर बॉण्डवर जमीन मंजूर केला आहे.

Last Updated : Feb 20, 2020, 5:42 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details