नागपूर- राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर परिणय फुकेंचे शहर भाजप तर्फे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. राज्य मंत्रीमंडळ विस्तारानंतर त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले होते. राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर परिणय फुके पाहिल्यांदाच शहरात आले आहे. पक्ष श्रेष्टींनी दिलेल्या जवाबदरीची पुर्तता करण्याचे तसेच भंडारा-गोंदियाचे मंत्रिमंडळात स्थान कायम राहावे यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
राज्यमंत्री परिणय फुकेंचे नागपुरात जंगी स्वागत - राज्यमंत्री परिणय फुके
राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर परिणय फुकेंचे शहर भाजप तर्फे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. राज्य मंत्रीमंडळ विस्तारानंतर त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले होते. राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर परिणय फुके पाहिल्यांदाच शहरात आले आहे.
राज्यमंत्री पदाची जवाबदारी घेणारे परिणय फुके हे मुख्यमंत्र्यांचे निकट वर्तीय मानले जातात. आदिवासी विकास आणि बांधकाम विभागाची त्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अवघ्या तीन महिन्याच्या कालावधित विकास कामाची पुर्तता करण्याचे प्रयत्न राहतील. राज्यासोबतच नागपूरचा सहभाग राहील तसेच पक्ष श्रेष्टींनी जी जबाबदारी सोपविली ती पूर्ण करणार असल्याचे मत परिणय फुके यांनी व्यक्त केले आहे.
१९९६ साली बुथ प्रमूखाची जवाबदारी स्वीकारुन त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. २००७ आणि २०११ मध्ये ते नगरसेवक झाले होते. २०१६ मध्ये भंडारा-गोंदियावरुण ते विधानपरिषदेला निवडून आले होते आणि आता त्यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जवाबदारी ते चांगल्याने निभवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.