नागपूर :नागपुरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे, एकाच दिवसात तब्बल २७४ रुग्ण आढळल्याने धोका वाढला आहे. दोन दिवसांपूर्वीच २२२ रुग्णांची नोंद झाल्यानंतर काल(रविवार) पुन्हा २२५ रुग्णांची भर पडली होती. मात्र, आज जुने सर्व रेकॉड मोडीत काढत २७४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने सामान्य नागरिकांसह शासन आणि प्रसासनाची चिंता वाढली आहे.
नागपुरात कोरोना 'आऊट ऑफ कंट्रोल'; एकाच दिवसात २७४ रुग्णांची नोंद, तर ५८ कोरोनामुक्त
आज तब्बल २७४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ३३६ वर पोहोचली झाली आहे. यामध्ये ९७ रुग्ण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रसासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज तब्बल २७४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ३३६ वर पोहोचली झाली आहे. यामध्ये ९७ रुग्ण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रसासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, आज ५८ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ हजार ५८३ इतकी झाली आहे. या शिवाय आज पुन्हा ६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत नागपूरात एकूण ८८ कोरोना बाधीत मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे ८८ पैकी ७३ मृत्यू हे नागपुर जिल्ह्यातील आहेत. तर, २१ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
सध्या नागपुरातील ०७ ठिकाणी १ हजार ६६५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात(मेयो) २६३, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडीकल) २५६, एम्समध्ये ५०, कामठी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये १० आणि खासगी रुग्णालयात ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ३४ आणि आमदार निवासमध्ये ३४५ रुग्णांवर तर व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरमध्ये १९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५९.५७ टक्के इतके आहे. तर, मृत्यूदर हा २.०२ इतका झाला आहे.