नागपूर - सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने, सरकारला वेळ दिला पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. सरकारने ही कर्जमाफी देताना कोणत्याही जाचक अटी ठेवल्या नाहीत. सातबारा कोरा झाला नसला तरी सरकार वाचन पाळणार आहे. सरकारला थोडा वेळ द्यायची गरज असल्याची प्रतिक्रिया भुयार यांनी दिली.
सरकारच्या तिजोरीत ठणठणाट, सरकारला वेळ दिला पाहिजे - आमदार देवेंद्र भुयार हेही वाचा -रोहित पवार आणि धीरज देशमुख यांची दीक्षा भूमीला भेट; युवकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन
भुयार म्हणाले, की सातबारा कोरा झाला पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा होती. पण शिवसेना शब्दाला जगणारी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे. हे सरकार सत्तेत येऊन जास्त दिवस न झाल्याने जास्त अपेक्षा करू नये, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -'महिला सुरक्षेबाबत कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा करणार'
अर्थसंकल्प बजेटमध्ये ठोस तरतूद झाली पाहिजे. कारण बुलेट ट्रेन रद्द झाली तर काही फरक पडणार नाही. मेट्रोचा फायदा नाही. पण शेतकऱ्याच्या ताटात अन्न नसताना बुलेट ट्रेन काय शेतकऱ्यांच्या उरावर नेणार का? असा सवाल त्यांनी फडणवीस सरकारला टोला लावत केला. अर्थसंकल्प बजेटमधून भरीव अशी तरतूद करण्याची घोषणा करावी, असेही भुयार म्हणाले. देवेंद्र भुयार हे शेतकरी पुत्र असून त्यांनी माजी कृषी मंत्री यांचा पराभव केला आहे.