नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेकडून आता ५३ नवे कोविड रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपुरात कोरोना रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारीनंतर ही व्यवस्था मनपा प्रशासनाने केली आहे. या नव्या रुग्णांलयामुळे शहरातील खाटांच्या संख्येत वाढ झाली आहेत. सध्या एकूण ३ हजार ४३६ इतक्या खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिवाय मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन केल्यास तत्काळ मदतही मिळणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता महानगरपालिका प्रशासनाकडून विविध खाजगी रुग्णालयांचे समावेश कोरोना रुग्णालयांत केल्या जात आहे. नागपूरातील रुग्णालयाची अवस्था पाहता महानगरपालिकेडून आता ५३ नवे कोरोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर महानगरपालिका प्रशासनाकडून दखल घेत हे पाऊल उचलण्यात आले आहे. या नव्या रुग्णालयांमुळे मनपा प्रशासनाला मोठी मदत मिळणार आहे. शिवाय नागरिकांनाही वेळेवर खाटा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
हेही वाचा -लोककलावंतांनी 'असे' केले अनोखे आंदोलन; कार्यक्रमाची परवागनी देण्याची मागणी