नागपूर - जिल्ह्यात आज दिवसभरात ५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नागपुरात दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संख्येत रुग्णांची वाढ झाली आहे. यापूर्वी ६ मे रोजी एकाच दिवशी ६२ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.आजच्या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ६८२ झाली आहे.
उपराजधानीत ५६ कोरोनाबाधितांची नोंद; रुग्णसंख्या ६८२वर - नागपूर कोरोना अपडेट्स
उपराजधानीत आज ५६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. या नवीन बाधितांसह जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६८२वर पोहोचली आहे.
उपराजधानीत ५६ कोरोनाबाधितांची नोेंद; रुग्णसंख्या ६८२वर
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण पाचपावलीच्या नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरातील आहेत. या सर्व रुग्णांना आधीच क्वारंटाईन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून नाईक तलाव आणि बांगलादेश या दोन्ही परिसरातुन मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ४१३ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर ५ जून संध्याकाळपर्यंत कोरोना अपडेट्स -
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - ६८२
मृत्यू - १३
करोनामुक्त - ४१३