नागपूर - शहरात शनिवारी १०२ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ८७६ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. तसेच ६५ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७९८ इतकी झाली आहे.
नागपुरात १०२ कोरोनाबाधितांची वाढ तर ६५ रुग्णांची कोरोनावर मात - Nagpur covid 19 cases
नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६२.५१ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा १.६३ इतका आहे. नागपूर शहरात शनिवारी १०२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
शिवाय शनिवारी पुन्हा दोन रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नागपुरात एकूण ४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. महत्वाच म्हणजे ४७ पैकी ३१ मृत्यू हे नागपुर जिल्ह्यातील आहेत तर १६ हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या नागपुरातील ७ ठिकाणी १०३१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेयो) १९४ तर शासकीय वैद्यकीय रुग्णांलयात (मेडीकल)१६९, एम्समध्ये ५५, कामठी येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये २९ आणि खासगी रुग्णालयात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये १३३ आणि आमदार निवासमध्ये २९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६२.५१ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा १.६३ इतका आहे.