नागपूर : नागपूर विद्यापीठात,लैंगिक छळ केल्याची भीती दाखवून सन २०१८ ते २०२० च्या दरम्यान काही प्राध्यापकांकडून खंडणी वसुली प्रकरणातील आरोपी, जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून एसआयटी(SIT) स्थापन करण्याची मागणी, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे ( Neelam Gorhe ) यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांच्याकडे केली आहे.
निलंबित करण्याची मागणी -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांकडून पैसे उकळण्याचे प्रकरण गंभीर आहे. विद्यापीठातील काही प्राध्यापकांकडुन "तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार आली आहे", अशा आशयाची भीती दाखवून जनसंवाद विभागातील डॉ. धर्मेश धवनकर यांनी प्राध्यापकांची फसवणूक केली. तसेच खंडणी वसूल केली. या गंभीर घटनेवर आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आज निवेदन दिले आहे. निवेदनाद्वारे त्यांनी प्रा. धर्मेश धवनकर यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.