नागपूर- अगदी महिन्याभरापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या निर्मल उज्ज्वल समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी शुक्रवारी प्रकाश आंबेडकरांची भेट घेत बंद दरवाज्याआड चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येण्यासाठी मानमोडे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याचे सांगितले आहे.
वंचित आणि काँग्रेसने विधानसभा एकत्र लढवावी; प्रमोद मानमोडेंची प्रकाश आंबेडकरांना विनवणी
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येण्यासाठी मानमोडे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याचे सांगितले आहे.
नागपूर
प्रमोद मानमोडे स्वत: दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यासाठी काँग्रेसचे तिकीट त्यांना मिळेल, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहें. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने सोबत येऊन विधासभा निवडणूक लढवावी, अशी प्रकाश आंबेडकरांची इच्छा असून कॉंग्रेसदेखील त्याकरता प्रयत्नात असल्याची माहिती प्रमोद मानमोडे यांनी दिली आहे.