महाराष्ट्र

maharashtra

'कोरोनापासून धडा घेऊन जीवनपद्धती बदलण्याची गरज'

पुढील काळात लॉकडाऊन शिथिल होवो अथवा न होवो नागरिकांना आपल्या सवयी बदलण्याची गरज आहे. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक, हॉटेल रेस्टॉरेंट, आदी सर्व सुरू झाल्यास त्यामध्ये पूर्वीसारखी आपली वागणूक बंद करावी लागणार आहे, असे मत नागपुरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले आहे.

By

Published : May 31, 2020, 4:01 PM IST

Published : May 31, 2020, 4:01 PM IST

Tukaram Mundhe (mnc commissioner, nagpur)
तुकाराम मुंढे (मनपा आयुक्त, नागपूर)

नागपूर -कोरोनापासून आपण धडा घेऊन आपली जीवन पद्धती यापुढे बदलविण्याची गरज आहे. येणार्या काळात आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. सोशल डिस्टंसिंग, फेस मास्क आणि स्वच्छता या गोष्टींचे आपल्याला प्रत्येक वेळी फक्त पालनच करायचे नाही तर त्याची सवयच लावून घ्यायची आहे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. तसेच त्या पद्धतीने आपले राहणीमान बदलावे, असेही ते म्हणाले.

तुकाराम मुंढे (मनपा आयुक्त, नागपूर)
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या चौथ्या लॉकडाऊनची मुदत आज (रविवारी) 31 मेला संपत आहे. या लॉकडाऊननंतर पुढे काय? नागरिकांच्या मनातील या प्रश्नावर मनपा आयुक्तांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरही त्यांनी दिली.पुढे बोलताना ते म्हणाले, पुढील काळात लॉकडाऊन शिथिल होवो अथवा न होवो नागरिकांना आपल्या सवयी बदलण्याची गरज आहे. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक, हॉटेल रेस्टॉरेंट, आदी सर्व सुरू झाल्यास त्यामध्ये पूर्वीसारखी आपली वागणूक बंद करावी लागणार आहे. बस किंवा ऑटोमधून प्रवास करताना तिथे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, मास्क वापरूनच प्रवास करण्यात येईल, सॅनिटायजरचा वापर होईल ही सर्व काळजी आपल्याला घ्यायची आहे. बसमध्ये किंवा ऑटोमध्ये बसताना चालकाला बस किंवा ऑटो सॅनिटायजिंग झाले अथवा नाही हे विचारपूस करूनच प्रवास करायचा आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरेंटमध्ये जाताना तिथेही संपूर्ण सॅनिटायजिंग झाले अथवा नाही याची खातरजमा करून घ्यावी. स्वत:ही नियमित मास्कचा वापर, सॅनिटायजर आणि वारंवार हात धुणे या सवयी अंगिकारणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तर सोबतच शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे झाल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details