महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र; नागपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 'भीकमांगो' आंदोलन - 'नरेंद्र - देवेन्द्र बेरोजगारीचं केंद्र'

मेट्रो आणि मिहान मध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळाव्या या मागणीसाठी तसेच भाजप सरकार मुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून मेगा भरतीच्या नावाखाली सुशिक्षितांची दिशाभूल करत असल्याच्या आरोप करित राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नागपूरात भीक मांगो आंदोलन केले.

आंदोलनकर्यांनी शासनाविरोधी घोषणाबाजी केली

By

Published : Jun 26, 2019, 9:36 PM IST

नागपूर - वाढत्या बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'भीकमांगो' आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नागपूरात भीक मांगो आंदोलन केले

'नरेंद्र-देवेंद्र' बेरोजगारीचं केंद्र' अशी घोषणाबाजी करित आंदोलनकर्त्यांनी शासनाचा निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांना पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. भाजप सरकारमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून मेगा भरतीच्या नावाखाली सुशिक्षितांची दिशाभूल करत आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारवर केला. मेट्रो आणि मिहानमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा अशा मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details