महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एका पदावरच बोळवण - नागपूर जिल्हा परिषद न्यूज

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यानंतर अगोदर उपाध्यक्षपद आणि नंतर दोन सभापतीपदाची राष्ट्रवादीची मागणी होती. मात्र, गुरुवारी झालेल्या सभापती निवडीत फक्त महिला व बालकल्याण हे एक सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला  मिळाले आहे.

नागपूर जिल्हा परिषद
नागपूर जिल्हा परिषद

By

Published : Jan 31, 2020, 8:23 AM IST

नागपूर -नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने मोठे यश मिळवले. काँग्रेसला ३० आणि राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या. जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यानंतर अगोदर उपाध्यक्षपद आणि नंतर दोन सभापतीपदाची राष्ट्रवादीची मागणी होती. मात्र, गुरुवारी झालेल्या सभापती निवडीत फक्त महिला व बालकल्याण हे एक सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त एक पद

हेही वाचा - 'मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत तपासणी करावी लागणार'
५८ जागा अससेल्या नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत एकट्या काँग्रेसला ३० जागा मिळाल्या. 26 वर्षांत पहिल्यांदा नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला इतके मोठे यश मिळाले. काँग्रेसने राष्ट्रवादीची फक्त एका सभापती पदावर बोळवण केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, दोन्हा पक्षांच्या नेत्यांनी वरिष्ठांकडून जे आदेश येतात ते पाळले जातात, असे सांगून चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ABOUT THE AUTHOR

...view details