महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परमबीर सिंह भाजपचे दलाल; राष्ट्रवादीचे नागपुरात आंदोलन - नागपूर गृहमंत्री अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी शहरातील संविधान चौकात फडणवीस यांच्या विरोधात नारे बाजी करण्यात आली. तसेच गृहमंत्री देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी परमबीर सिंह हे भाजपाचे दलाल आहेत, अशी टीका करत त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला चपला मारून आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे नागपुरात आंदोलन
राष्ट्रवादीचे नागपुरात आंदोलन

By

Published : Mar 22, 2021, 7:46 AM IST

नागपूर - अँटिलिया स्फोटके प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची उचलबांगडी आणि त्यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी शहरातील संविधान चौकात फडणवीस यांच्या विरोधात नारे बाजी करण्यात आली. तसेच गृहमंत्री देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी परमबीर सिंह हे भाजपाचे दलाल आहेत, अशी टीका करत त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला चपला मारून आंदोलन करण्यात आले.

परमबीर सिंह भाजपचे दलाल

भाजपला प्रत्युत्तर-

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्फोटक पत्र समोर आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा घ्यावा, यासाठी भाजप रान पेटवले आहे. भाजपच्या वतीने राज्यभर ठीक ठिकाणी निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. तसेच भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने रविवारी गृहमंत्री देशमुखांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील संविधा्न चौकात आंदोलन केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर षडयंत्र करून बदनामी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केलेला हा सुनियोजीत कट आहे. भाजप हे स्वतःचे पाप लपवण्यासाठी मंत्र्यांना बदनाम करत असल्याचाही आरोप अहिरकर यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details