नागपूर-उन्नाव बलात्कार केसमध्ये कुलदीप सिह सेंगर यांना आज दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले. या बलात्कारी भाजप आमदाराला कठोर शिक्षा न्यायालय सुनावेल. भाजप आपल्या आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, उत्तर प्रदेश कोर्टात हा खटला न चालवता दिल्लीत चालवण्यात आला. त्यामुळे हा आरोप सिद्ध झाला आहे. भाजपच्या अजूनही काही माजी मंत्र्यांवर अशा प्रकारच्या केसेस चालू आहेत, त्याच्यावरील खटले दुसरीकडे हलविण्याची मागणी आम्ही करत आहोत, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बलात्कारी भाजप आमदाराला न्यायालय कठोर शिक्षा सुनावेल - नवाब मलिक - नवाब मलिक मुंबई बातमी
भाजप शेतकऱ्यांचा विचार करणारा पक्ष नसून त्यांना लुटणाऱ्याचा पक्ष आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका असती तर राहुल गांधी याचा मुद्दा पुढे करत गोंधळ घातला नसता. विधान परिषदेत नियमाने राहुल गांधी यांचा मुद्दा मांडला येत नसताना हा मुद्दा पुढे करत गोंधळ घातला गेला.
हेही वाचा-दिल्ली जळत असताना देशाचे गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त - सुप्रिया सुळे
भाजप हा शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष-
भाजप शेतकऱ्यांचा विचार करणारा पक्ष नसून त्यांना लुटणाऱ्याचा पक्ष आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका असती तर राहुल गांधी याचा मुद्दा पुढे करत गोंधळ घातला नसता. विधान परिषदेत नियमाने राहुल गांधी यांचा मुद्दा मांडला येत नसताना हा मुद्दा पुढे करत गोंधळ घातला गेला, असेही मलिक यांनी सांगितले.