महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

temperature increase : नवतपा वाढवणार नागरिकांचा ताप , विदर्भात पुढील 9 दिवस तापमानाचा पारा वाढणार

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. त्यात आता नवतपा सुरू झाला असल्याने पुढील काही दिवस हे कठीण जाणार हे मात्र निश्चित आहे. नवतपा काळ सुरू झाला असल्याने तापमान वाढले आहे. तर प्रचंड उकाडा आणि भीषण गरमीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तापमानात वाढ सुरू असल्याने विदर्भात उष्णतेमुळे होणारी होरपळ कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. मे महिन्यात सूर्यनारायण पूर्ण क्षमतेने तापलेला आहे. उन्हाळा अगदीच शेवटच्या टप्यात आला असताना नवतपा लोकांचा ताप वाढवेल असे चित्र निर्माण झाले.

Navtapa increase temperature
नवतपा वाढवणार तापमान

By

Published : May 27, 2023, 7:37 AM IST

नागपूर : मान्सूनच्या आगमनासाठी भारताचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल. दुसरीकडे गुरुवारपासून विदर्भ आणि मध्यभारतात 'नवतपा'ला सुरुवात झाली आहे. दरम्यान गेल्या काही दिवासांपासून विदर्भात उष्णतेची लाट असून ती कायम आहे. त्यात आता नवतपा सुरू झाला आहे, यामुळे नागरीक उकाड्यामुळे जास्त हैराण होतील.

नवतपा वाढवणार तापमान

नवतपा म्हणजे नेमके काय ?: नवतपा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उष्ण 9 दिवस. या दिवसांमध्ये तापमान मोजणाऱ्या यंत्रावर पारा कमी दिसतो पण तापमान मात्र जास्त असतो. उत्तरेकडील अनेक राज्यांमधून वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होत असतो. दरम्यान नवतपाला हवामानशास्त्रात कोणतेच स्थान नाही म्हणजेच असा काही प्रकार यात मानला जात नाही. पण या 9 दिवसांमध्ये सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात. त्यामुळे तापमानात वाढ होत असते, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

या काळात असतो नवतपा :दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवतपाला सुरुवात होते. नवतपाच्या काळात पृथ्वीवर उष्णता प्रचंड वाढते. हिंदू ज्येष्ठ महिन्यात नवतपा येतो. सूर्य ज्यावेळी 15 दिवसांकरिता रोहिणी नक्षत्रात येतो, त्यातील सुरुवातीच्या 9 दिवसाला नवतपा, असे म्हटले जाते. पावसाळ्याची दशा आणि दिशा कशी राहील हे ठरवण्यासाठी नवतपाच्या 9 दिवसांना फार महत्त्व आहे. या 9 दिवसांमध्ये पाऊस किंवा थंड वारे नसल्यास मान्सूनचा पाऊस चांगला होईल. तसेच या दिवसात पाऊस आला तर मान्सूनचा प्रवास अडथळ्यांचा असतो असे म्हटले जाते.

लोकांनी तयारी केलेली सिस्टीम :नवतपा हा विषय नागरिकांनीचं हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आपल्या सोयीसाठी तयार केलेली एक सिस्टीम आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात नवतपा नावाचा कोणताही प्रकार नसतो, अशी माहिती हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. नवतपाच्या संदर्भात लोकांमध्ये अनेक मान्यता आहेत. नवतपातील वातावरणावर पावसाची दशा ठरत असते. या दिवसांवरुन नागरीक पावसाचा अंदाज लावत असतात. नवतपाची एकप्रकारे नागरिकांमध्ये काहीशी दहशत निर्माण झाली आहे. या दिवसात एसी आणि कुलर देखील निष्क्रिय ठरतात. मात्र, यावर्षी वातावरणात काहीसा बदल दिसून येत असल्याने नवतपा किती प्रभाव सोडेल हे सुद्धा बघण्यासारखे असेल.

हेही वाचा -

  1. Climate Change : हवामान बदलामुळे जगभरातील प्रजातींना धोका, नव्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी लावला 'हा' अंदाज
  2. Monsoon Update : पावसाची बातमी! भारतात या दिवशी दाखल होणार मान्सून, यंदा पाऊस..

ABOUT THE AUTHOR

...view details