नागपूर -राज्य सरकारच्या मंत्र्यांना त्यांची केलेल्या घोषणांचा विसर पडला आल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शाखा असलेल्या युवा सेनेने केला. ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी १०१८मध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यात ७२ ओबीसी वसतिगृह बांधण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याच घोषणेचा त्यांना विसर पडला असून त्याची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांची भेट घेतली. काल (सोमवारी) ही भेट झाली.
राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे कार्याध्यक्ष शुभम वाघमारे माध्यमांशी बोलताना येत्या महिनाभरात या मागणीच्या अनुषंगाने जीआर काढला नाही तर वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. परिणामी आत्मदाह देखील करू, असे संतप्त कार्यकर्त्यांनी सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या आधी चंद्रपूरमध्ये पार पडलेल्या ओबीसी महाअधिवेशनात खुद्द विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी केलेल्या घोषणेबाबत त्यांना सांगण्यात आले.
हेही वाचा -पालघर येथील मच्छीमाराने देखाव्यातून वाढवण बंदरसह आदी प्रश्नांकडे वेधले लक्ष
वसतिगृहात मुद्दा राजकीय ठरला -
या कार्यकर्त्यांचा दावा आहे, २०१९च्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने राज्यात ओबीसींसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ वसतिगृह उभारण्याची घोषणा केली होती. भाजपच्या त्याच घोषणेला राजकीय शह देण्यासाठी विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी राज्यात ३६ नव्हे तर ७२ वसतिगृह उभारू, असे चंद्रपुरातील ओबीसी महाअधिवेशनात जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असला तरी ७२ वसतिगृह उभारण्याच्या घोषणेचा ओबीसींचा विभाग सांभाळणाऱ्या वडेट्टीवार यांनाच विसर पडला आहे. त्यांच्या २०१८ च्या त्याच घोषणेची आठवण करून द्यायला राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे कार्यकर्ते विजय वडेट्टीवार यांना भेटले. तेव्हा वडेट्टीवार यांनी यासंदर्भात लवकरच पावले उचलू, असे आश्वासन दिले.