महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते - नारायण राणे - नागपूर बातमी

सरकार आल्यानंतर कोणते निर्णय घ्यावेत, कोणते प्रकल्प असावेत, या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे होते. मात्र, तीन पक्षांची महाविकासआघाडी झाली. ती कोणत्याही विचार धारेलाधरून झालेली नाही. त्यांच्या विचारधारा वेगळ्या आहेत.

narayan-rane-comment-on-uddhav-thackeray
नारायण राणे

By

Published : Dec 20, 2019, 6:03 PM IST

नागपूर- बाळासाहेब ठाकरे आज असते, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते. महाविकास आघाडीही स्थापन झाली नसती. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी आहे, असे मत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

हेही वाचा-आनंद महिंद्रा चेअरमन पदावरून होणार पायउतार

सरकार आल्यानंतर कोणते निर्णय घ्यावेत, कोणते प्रकल्प असावेत, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवे होते. मात्र, तीन पक्षांची महाविकास आघाडी झाली. ती कोणत्याही विचारधारेला धरून झालेली नाही. त्यांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. उद्धव ठाकरेंनी ही आघाडी फक्त मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून केलेली आहे. त्यांनी जनता, राज्य याचा विचार केलेला नाही, असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. एरव्ही अधिवेशन काळात नागपुरात दिवाळी सारखे वाटायचे, पण यावेळी असे वाटत नाही. शिवसेनेची स्थापना हिंदूत्व विचारसरणीवर झालेली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. महाविकास आघाडीची सत्ता आली नसती. मात्र, भिन्न विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येत सत्ता स्थापण केली. यात फक्त सत्तेची लालसा होती, असेही राणे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details