नागपूर -परमबीर सिंग यांच्यासरख्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करावेत हे गंभीर आहे. खरतर शासकीय अधिकाऱ्याने न्यायालयात जाताना शासनाची परवानगी घेणे अवश्यक असते. केंद्र शासनाच्या आशीर्वादाने हे होत आहे. कारण रोहतगी हे केंद्राचे वकील आहेत, आता तेच परमबीर सिंग यांचे वकील झाले आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे ? हे जनतेला कळेलच अंस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ते शनिवारी नागपुरात बोलत होते.
जिलेटीनचे नागपूर कनेक्शन
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मुख्य सचिवांनी तयार करून दिलेला अहवाल मंत्र्यांनी लिहून दिला, असे बालिशपणाचे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे, ते चुकीचे आहे. अंबानीच्या घरापूढे मिळालेले जिलेटीन हे नागपूरमधून गेले होते. तसेच पुलवामा हल्ल्यातील स्फोटके देखील नागपूरमधून गेले होते. याचे काय कनेक्शन आहे? याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही यावेळी पटोले म्हणाले.