नागपूर -काँग्रेसचे नेते हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसून धीर देण्याचे काम करत आहे. पण राज्यात ईडीच्या भरवश्यावर आलेले सरकार झोपी गेले आहे. मोदी सरकारच्या आशीर्वादामुळे लोकशाहीत अमान्य असलेले हे सरकार महाराष्ट्रात आल्याची टीका त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. ते शुक्रवार पासून विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत ( Nana Patole In Vidarbha ).
जनता उपाशी सरकार तूपाशी -राज्यातली जनता ही वाऱ्यावर असताना केंद्रातील मोदी सरकार ( Modi government ) हे तुपाशी असल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली. विदर्भात मोठ्या प्रमाणात झालेल्या शेती नुकसानीचा आढावा घेऊन दोन दिवसाचा दौरा करत याचा अहवाल राज्याचे सचिव मुख्यमंत्री आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना देणार आहे. एकीकडे या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या ( Farmers commit suicide )होत आहे, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, त्यामुळे झोपी गेलेल्या सरकार्ला जाग करण्याचे काम दौऱ्याच्या माध्यमातून केले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तार -एक महिना लोटूनही सरकार स्थापन झालेले नाही तारीख पे तारीख देत दिल्लीवारी केली जात आहे. दिल्लीच्या सरकारच्या दबावाखाली येऊन सरकार स्थापन झालेले आहे. पण दोन्ही पक्षाचे आमदार सांभाळता येत नाही, त्यामुळे सरकार केव्हा पडेल मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे. भीतीमुळे यात सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन सरकार पडेल अशी भीती भाजपला असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
असंविधानीक पद्धतीने हे सरकार अपंग -सरकार पूर्ण होण्यासाठी घटनेच्या कलम 146/1 क प्रमाणे कमीत कमी बारा जणांचे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची गरज असते, ज्या पद्धतीने हे असंविधानीक पद्धतिमे अपंगत्वाने चालत आहे, त्यामुळे त्यांना थट्टा करायला नाही तर घटनेप्रमाणे हे सरकार चालत नसल्याने अपंग सरकार म्हटलं आहे. हा त्यातील महत्वाचा मुद्दा आहे. आमदार खासदार यांची बोली लावून ब्लॅकमेल केले जात आहे, हे महाराष्ट्रात होत आहे यापूर्वी कधीही झालेले नाही. आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख असतांना संविधानिक व्यवस्था तोडून पुरोगामी ओळख पुसण्याचे काम केले जात आहे.