नागपूर- मतमोजणी केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशांत पवार यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे ही लोकशाही नाही तर हुकूमशाही असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल भाजप सरकारच्या हुकूमशाहीचे प्रतिबिंब- नाना पटोले - election
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल हे भाजप सरकारच्या हुकूमशाहीचे प्रतिबिंब असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघात स्ट्रांग रूम चोरी प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागितली, त्याच प्रकारे अश्विन मुद्गल यांना न्यायालयात उत्तर देऊ, असेही पटोले यांनी सांगितले.
मतमोजणीच्या दिवशी व्हीव्हीपॅट मोजणीच्या वेळी चिठ्ठ्या योग्य क्रमा नुसार टाकल्या जात नसल्याने काँग्रेस उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह इतर काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आम्ही अधिकार मागितला असताना आमच्या वर गुन्हे दाखल झाले असतील तर ही हुकूमशाही तानाशाही आहे, असा आरोप पवार यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल हे भाजप सरकारचे प्रतिबिंब असल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला. उमरेड विधानसभा मतदारसंघात स्ट्राँग रूम चोरी प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागितली, त्याच प्रकारे अश्विन मुद्गल यांना न्यायालयात उत्तर देऊ. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला शिंग दाखवली तर आम्ही त्यांना शिंगावर उचलू, असा पवित्रा नाना पाटोले यांनी जिल्हाधिकाऱयां विरोधात घेतला आहे.